सोने-चांदी खरेदी करण्याआधी जाणून घ्या आजचे भाव : ११ सप्टेंबर २०२१

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२१ । गणेशचतुर्थीच्या दिवशी बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या भावात घसरण होताना दिसली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या भावात 0.14 टक्क्यांनी घसरण झाली होती. त्यामुळे जळगाव सराफ बाजारात सोने ४८ हजार २०० च्या घरात होते. तर दुसरीकडे शुक्रवारी चांदीच्या दरात 0.05 टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे चांदी ६६ हजाराच्या घरात आहे.

मागील काही दिवसापासून सोने दर एका विशिष्ठ पातळीवरून वरखाली होतानाचे दिसून येत आहे. जळगाव सराफ बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीत मोठी वाढ नोंदविली गेली होती. परंतु गेल्या दोन दिवसापासून सोने दर घसरत आहे. मात्र गुरुवारी सोने दरातील घसरणीला ब्रेक लागला आहे.

या आठवड्यात सोने दोन वेळा महाग तर दोन वेळा स्वस्त झालं आहे. जवळपास सोने ६०० रुपयापर्यंत स्वस्त झालं तर ६६० रुपयापर्यंत महागले आहे. एकंदरीत सोने या आठवड्यात ५० ते १०० रुपयाची किंचित वाढ झालीय.

ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या भावाने प्रती १० ग्रॅमसाठी ५६ हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास ८ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय.

दुप्पट होऊ शकतो सोन्याचा दर 

पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किंमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. HDFC सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत.

याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.

आजचा जळगावातील सोन्याचा दर
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४८१४ रुपये इतका आहे तर १० ग्रॅम ४८,१४० रुपये आहे.

आजचा जळगावातील चांदीचा भाव
चांदीचा एक किलोचा भाव ६५,६९० रुपये इतका आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -