⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

सोने पन्नाशीच्या दिशेने ; चार दिवसांत ७६० रुपयांनी महागले, चांदीही महागली, वाचा आजचा भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२२ । केंद्रीय बँकांच्या संभाव्य व्याजदर वाढीच्या पार्श्वभूमीवर सोने (Gold) दरातील तेजी कायम आहे. जळगाव (Jalgaon) सुवर्णनगरीत सलग चौथ्या दिवशी सोने दरात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदी (Silver) देखील महागली आहे. आज गुरुवारी सोने २४० रुपायांनी महागले आहे. तर चांदी ३३० रुपयांनी महागली आहे. यापूर्वीही कालच्या सत्रात सोने २०० रुपयांनी तर चांदी तब्बल ३४० रुपयांनी महागली होती. सध्या भाववाढीने सोने पुन्हा लवकरच ५०,००० रुपयांचा स्तर गाठण्याची शक्यता आहे. तर चांदीच्या दराने ६४ हजारी पार केली आहे.

आजचा सोने-चांदीचा भाव?

गुरुवारी जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९,८०० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा ६४,१६० रुपये प्रति किलो इतका झाला आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते. दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ दिसून येते.

सोने वाढीचे कारण?

भांडवली बाजारातील अनिश्चितता, गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणुकीचा वाढता ओघ, महागाई आणि बॉण्ड यिल्डमध्ये झालेली वाढ, फेडरल रिझर्व्हची दरवाढ असे अनेक घटक सध्या सोन्याच्या किमती वाढण्यास पोषक ठरत आहेत. सोने भाव वाढीसोबतच चांदी देखील वधारत आहे. जळगाव (Jalgaon) सुवर्णनगरीत गेल्या चार दिवसात सोने ७६० रुपयांनी महागली आहे. तर चांदी २००० हजार रुपयांनी महागली आहे.

यापूर्वी गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात २०० रुपया पर्यंतची घट दिसून आली. तर दुसरीकडे चांदीच्या भावात १२०० रुपयाची घट झाली आहे. मात्र चालू आठवड्यात सोन आणि चांदी दरात तेजी दिसून येतेय. जळगाव सराफ बाजारात १ फेब्रुवारी २०२२ रोजी सोन्याचा प्रति तोळ्याचा दर ४८,८०० इतका होता. तर चांदीचा भाव ६२,४१० रुपये किलो इतका होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे दोन्ही धातूंमध्ये हालचाल होत असल्याचे दिसून आले.

दरम्यान, येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत.

या आठवड्यातील दर

सोने दर :
७ फेब्रुवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०५० रुपये प्रति तोळा
८ फेब्रुवारी (मंगळवार) ४९,३६० रुपये प्रति तोळा
९ फेब्रुवारी (बुधवारी) ४९,५६० रुपये प्रति तोळा
१० फेब्रुवारी (गुरुवार) ४९,८०० रुपये प्रति तोळा

चांदी दर:
७ फेब्रुवारी (सोमवार) चांदीचा दर ६२,२८० प्रति किलो
८ फेब्रुवारी (मंगळवार) चांदीचा दर ६३,४९० प्रति किलो
९ फेब्रुवारी (बुधवारी) चांदीचा दर ६३,८३० प्रति किलो
१० फेब्रुवारी (गुरुवार) चांदीचा दर ६४,१६० प्रति किलो

सूचना : सदर सोने आणि चांदीने दर हे ऑनलाईन आहे. तरी अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा

हे देखील वाचा :