ऑगस्टची सुरुवात उत्तम झाली! सोने-चांदीचा भावात मोठी घसरण, नवीन दर पहा..

ऑगस्ट 1, 2025 12:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२५ । मागच्या जुलै महिन्यात सोन्यासह चांदीच्या किमतीने गगनभरारी घेतल्याचं दिसून आले. सोन्याच्या किमतीने विनाजीएसटी १ लाख रुपयाचा टप्पा ओलांडला होता. तर चांदीने देखील ऐतिहासिक पातळी गाठली होती. याच ऑगस्टपासून सणासुदीचे दिवस सुरु होत असल्याने या महिन्यात सोन्यासह चांदीचे दर कुठवर जाणार याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. मात्र ऑगस्ट महिन्याची सुरुवात गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे.

gold silver jpg webp

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अशामध्ये सोन्याचे दर कमी झाल्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी आज चांगली संधी आहे.

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज सोन्याच्या दरात घसरण झाली. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर २१० रुपयांनी घसरून ९९,८२० रुपयावर पोहोचले आहे. पण जीएसटीसह हेच सोनं खरेदीसाठी तुम्हाला १ लाखांपार पैसे मोजावे लागणार आहेत. गुरूवारी याच सोन्यासाठी तुम्हाला १,००,०३० रुपये खर्च मोजावे लागले.

तर २२ कॅरेटच्या एक तोळा सोन्याच्या दरामध्ये २०० रुपयांनी घसरण झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ९१,५०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. गुरूवारी हेच सोनं खरेदीसाठी ९१,७०० रुपये द्यावे लागले. तर आज १८ कॅरेट सोन्याच्या दरात देखील आज घसरण झाली आहे.१८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात १६० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला आज ७४,८७० रुपये खर्च करावे लागतील.

विशेष सोन्यासह आज चांदीचा दर देखील घसरला आहे. आज १ किलो चांदीचे दर २००० रुपयांनी कमी झालेत. १ तोळा चांदी खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,१३,००० रुपये द्यावे लागतील.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now