⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

सोने महाग, तर चांदी स्वस्त ; ‘हे’ आहेत आजचे जळगावातील दर

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ जुलै २०२१ । मागील जून महिन्यात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु जुलैच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात वाढ होतानाचे दिसून येत आहे. जळगाव सराफ बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आज सोने प्रति ग्रम ३२० रुपयाने वाढले आहे. तर आज चांदीच्या दरात घट झाली आहे. आज चांदी २०० रुपयाने स्वस्त झाली आहे.

संपूर्ण जगात कोरोना महामारीने हाहाकार माजवीला असून अनेक आर्थिक संपन्न देश आर्थिक संकटाशी त्यांना आता लढावे लागत आहे. त्यामुळे जागतीक सुवर्ण बाजारपेठवर देखील याचा मोठा परिणाम पडून सोन्याचे भाव वधारले होते. भारतात देखील गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर ५८ हजार रुपये तोळे असे झाले होते. तर चांदी ७० हजाराच्या आसपास झाली होती. 

पंरतू कोरोना व्हॅक्सीन आल्यानंतर तसेच आंतराष्ट्रीय बाजारपेठेतील चढउतारामुळे सोन्याचे दरात कमालीची घसरण झाली आहे. त्यामुळे भारतात सध्या सोन्याचे दर ४८ हजार रुपयाच्या घरात आले आहे. तर जळगाव सराफ बाजारात मागील महिन्यात सोन्याचा भाव दीड ते दोन हजाराहून अधिकने कमी झाले. जळगाव सराफ बाजारात आज शनिवारी सोने महागले आहे तर चांदी स्वस्त झाली आहे.   

आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,७८१ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४७,८१० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४५५३ रुपये असून १० ग्रॅमचा सोन्याचा भाव ४५,५३० रुपये आहे.

चांदीचा भाव

तर चांदीच्या भावात देखील हालचाली दिसून येत आहे. आज चांदी २०० रुपयाने स्वस्त झाली आहे. त्यामुळे  आज चांदीचा एक किलोचा भाव ७३,९०० रुपये इतका आहे.