जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२२ । काल आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून आली. त्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ दिसून आली. जागतिक बाजारातील वाढीचा परिणाम भारतीय बाजारावर झाला आहे. या दरवाढीने सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव पुन्हा वरच्या दिशेने जाऊ लागला आहे. Gold Silver Price Today
MCX वर, 24-कॅरेट शुद्धतेचे सोने सकाळी 10 वाजेपर्यंत 200 रुपयांनी वाढून 50,623 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होते. आज सोन्याचा व्यवहार 50,555 रुपयांपासून सुरू झाला. दर उघडल्यानंतर त्यात वाढ झाली. सोन्यापाठोपाठ चांदी भाव देखील वधारला आहे. आज सकाळी चांदीचा प्रति किलोचा दर 440 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे एक किलो चांदीचा भाव 53,827 रुपयावर गेला आहे. आज चांदीचा व्यवहार 53,980 रुपयांपासून सुरू झाला. काही काळानंतर त्यात वाढ झाली.
जळगावातले दर :
जळगावातमध्ये 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास 47,200 रुपये इतका आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास 51,600 रुपायांपर्यंत आला आहे.तर दुसरीकडे चांदीचा एक किलोचा भाव 54,500 रुपये इतका आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदी महागली
आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. सोन्याचा भाव ०.६८ टक्क्यांनी वाढून १७१९.७२ डॉलर प्रति औंस झाला आहे. त्याचप्रमाणे आज आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदीची स्पॉट किंमत मजबूत झाली आहे. आज चांदी 2.08 टक्क्यांच्या वाढीसह 18.33 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.
महाराष्ट्रातील चार प्रमुख शहरातील दर
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,७५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,००० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,७८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,०३० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,७८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,०३० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,७८० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,०३० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५३२ रुपये आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)