⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

आज सोने-चांदी स्वस्त की महाग? जाणून घ्या जळगावातील नवे दर

जळगाव लाईव्ह न्यूज ।२६ मे २०२१ । जळगावातील सुवर्णबाजारात काल मंगळवारी सोन्याचे दर वधारले होते. त्यानंतर दुसर्या दिवशी आज बुधवारी सोन्याचा दर जैसे थे आहे. मात्र, चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज चांदीच्या प्रति किलो दरात ६०० रुपयांनी वाढ झाली आहे.

रोनाची दुसरी लाट आणि त्याचे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम यामळे गुंतवणूकदार धास्तावला आहे. अशा अस्थिर वातावरणात सोनंच सुरक्षित पर्याय असल्याने सध्या सोन्याकडे गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. त्यामुळे मागील गेल्या तीन चार दिवसापासून जळगावातील सुवर्णबाजारात  सोने आणि चांदीच्या दरात मोठी चढ उतार दिसून आली आहे.

 सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,९१७ रुपये झाला आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४९,१७० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,६८३ रुपये इतका आहे. तर १० ग्रामसाठी तुम्हाला ४६,८३० रुपये मोजावे लागतील.

चांदीचा भाव 

आज चांदीच्या भावात वाढ झाली आहे. आज १ ग्राम चांदीचा भाव आज ७६.०२ रुपये इतका असून १ किलोचा दर ७६,२०० रुपये इतका आहे.