⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

Gold-Silver Today : सोने पुन्हा महागले, चांदीही वधारली ; तपासून घ्या आजचा भाव..

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२३ । सोने आणि चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहे. काल आठवड्याच्या पहिल्या दिवशी सकाळी सोन्याच्या (Gold Rate) किमतीत घसरण झालेली दिसून आली. मात्र आज मंगळवारी दुसऱ्याच दिवशी वाढ झालेली दिसून येतेय. सोबतच दोन तीन दिवसापासून स्थिर असलेली चांदी (Silver Rate) देखील वधारली आहे. Gold Silver Rate Today

आजचा सोन्याचा भाव काय?
जळगाव सुवर्ण नगरीत मंगळवारी सकाळी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत अंदाजित 55,500 रुपये (विना जीएसटी) इतका आहे. तर 24 कॅरेट एक तोळा सोने आज सकाळी 60,500 रुपये (विना जीएसटी) आहे. यापूर्वी काल सकाळी 24 कॅरेट सोन्याचा दर 60,200 रुपये तोळा होता. त्यात आतापर्यंत 300 रुपयाची वाढ झाली आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे गेल्या काही दिवसात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचं किमतीने आतापर्यंत सगळे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. यामुळे अनेकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. अजून काही दिवस भावात तेजी राहणार असल्याचा दावा तज्ज्ञ करत आहेत. पुढील आठवड्यात सोन्याचा प्रति तोळ्याचा दर 63 हजार रुपयापर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

 सोन्याचा दर कुठपर्यंत जाणार?

आजचा चांदीचा दर काय?
आज चांदीचा एक किलोचा भाव 74,800 रुपये (विना जीएसटी) इतका आहे. यापूर्वी काल सकाळी चांदीचा दर 74600 रुपये इतका होता. चांदीच्या दरात तेजी राहणार असून पुढील आठवड्यात चांदी 78 हजार रुपयांवर जाऊ शकते.

हॉलमार्कचा संबंध
24 कॅरेट सोने शुद्ध मानण्यात येते. त्यावर 999 अंक चिन्हांकित असते. या सोन्यापासून दागिने तयार करण्यात येत नाही. 22 कॅरेट चे दागिने असतील तर त्यावर 916 अंक चिन्हांकित असतो. 21 कॅरेटचे दागिने असतील तर त्यावर 875 हा अंक चिन्हांकित करण्यात येतो. 18 कॅरेटच्या ज्वेलरीवर 750 अंक असतो. तर 14 कॅरेटच्या दागिन्यावर 585 अंक असतो.