Gold Rate : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचा भाव घसरला, खरेदीला जाण्यापूर्वी नवीन दर तपासून घ्या..

जुलै 26, 2025 10:30 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२५ । या आठवड्यात सोने आणि चांदी दराने नवा विक्रमी दर गाठला. एकीकडे सणासुदीचे दिवस आले असताना सोन्यासह चांदीचे दर गगनाला भिडल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण आहे. मात्र अद्यापही सोन्याचा दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.

gold silver

गुडरिटर्न्सनुसार, आज शनिवारी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सलग दोन दिवसांपासून सोन्याचे दर घसरले आहेत. आज १ तोळा सोन्याच्या दरात ५५० रुपयांनी घसरण झाली आहे. १० तोळा सोन्याचे दर ५५०० रुपयांनी घसरले आहेत.

आताचे सोन्याचे दर काय ?

आजच्या घसरणीनंतर आता १ तोळा सोन्याचे दर ९९,९३० रुपये झाले आहेत. तर ८ ग्रॅम सोन्याचे दर ७९,९४४ रुपये आहेत. या दरात ४४० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच आज २२ कॅरेट सोन्याचे दर ५०० रुपयांनी घसरले आहेत. १ तोळा सोन्याचे दर ९१,६०० रुपये आहेत.

दरम्यान सोन्याचे दर भविष्यातदेखील असेच वाढत जातील, असं सांगितलं जात आहे. सोन्याने गेल्या काही वर्षात शेअर मार्केटपेक्षाही जास्त परतावा दिला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोने घेणे ही एक गुंतवणूक आहे. परंतु सोन्याचे भाव सध्या एवढे वाढत आहेत की, हे सर्वसामान्यांना परवडण्याजोगे नाही आहे. त्यामुळे आता सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now