जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२४ । सध्या सोन्याच्या किमतीत दिलासा मिळण्याचे चिन्ह दिसत नाहीय. आज गुरुवारी सोन्याच्या किंमतींनी नवीन शिखर गाठले. सोन्याची किंमत पहिल्यांदाच 67,000 रुपयांवर गेला. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घाम फुटला.

जागतिक बाजारात सोन्याची किंमत पहिल्यांदा 2200 डॉलर प्रति औसवर पोहचली. त्याचा लागलीच परिणाम भारतीय बाजारात दिसून आला. आज सराफा बाजारात अनेक ठिकाणी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 67,000 रुपयांच्या घरात पोहचली. सोन्याने चमकदार कामगिरी केली. सराफा बाजारात खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकांना नव्या दराने धक्का बसला.

वायदे बाजारात सोने सूसाट
गुरुवारी सोन्याच्या किंमतीत अचानक उसळी आली. वायदे बाजारात (MCX) सोन्याची किंमत 66,943 रुपये प्रति 10 ग्रॅम स्तरावर पोहचली. वायदे बाजारा सुरु होताच काही मिनिटात सोन्याने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी बजावली. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) बुधवारी सोने आणि चांदी वधारली. 24 कॅरेट सोने 65,689 रुपये होते. तर आज हा भाव 66,968 रुपयांच्या घरात पोहचला. बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, जागतिक बाजारात सोन्याचा भाव 2,203.35 डॉलर प्रति औसच्या जवळपास आहे.
सोन्याच्या किंमतीत अचानक तेजीमागे अमेरिकेतील घडामोडींचा समावेश आहे. केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हची बुधवारी बैठक झाली. यामध्ये बँकेने व्याजदरात कोणताही बदल केला नाही. व्याज दर 5.25 ते 5.50 टक्के स्थिर होता. तसेच बँकेने तिसऱ्यांदा व्याजदरात लवकरच कपातीचे संकेत दिले. त्याचा लागलीची परिणाम दिसून आला. सोन्याचा भाव वधारला.












