---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

जळगावात बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधील तीन तोळे सोने लंपास

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. विशेष एसटी बसस्थानकावर पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे व पोलिस बंदोबस्त नसल्याने सातत्याने चोऱ्या होत आहेत. अशातच जळगाव ते वैजापूर या बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या पर्समधून तीन तोळे सोने भामट्याने लंपास केले. प्रकरणी २१ रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

crime 2 jpg webp webp

नवीन बस्थानकात २० रोजी दुपारी ३ वाजता जळगाव ते वैजापूर या बसमध्ये (क्र. एमएच-४०, एन- ९६६८) दीपिका अजयकुमार तिवारी (क्य ३२, रा. श्रीकृष्णनगर, सिल्लोड) या चढत असताना त्यांच्या पर्समधून ३० ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत, प्रत्येकी ३ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या व दोन भार वजनाचे चांदीचे पैजण असा ९५ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला.

---Advertisement---

काही वेळातच ही बाब लक्षात आल्यानंतर दीपिका यांनी वाहकाच्या मदतीने शोध घेतला. नंतर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, हेड कॉन्स्टेबल अलका शिंदे तपास करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी घटनेनंतर बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता दोन महिला संशयितपणे दीपिका यांच्या आजूबाजूला वावरत असल्याचे दिसून आले आहे. या महिलांनीच ही चोरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---