---Advertisement---
गुन्हे जळगाव शहर

विवाहितेची सोन्याची पोत दुचाकीस्वारांनी लांबवली

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट । शहरातील माजी प्राचार्य विवेक काटदरे यांच्या पत्नी प्रतिमा काटदरे यांच्या गळ्यातून दुचाकीस्वारांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पन्नास हजार रूपये किमतीची सोन्याची पोत लांबविल्याची घटना बुधवारी सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास प्रेमनगर भागातील बेंडाळे नगरात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

gold chain snatching jalgaon bendalenagar

बेंडाळे नगरात प्रतिमा काटदरे या पती व मुलासह वास्तव्यास आहेत. बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्या दूध घेण्यासाठी घराबाहेर पडल्या. दूध घेऊन आल्यानंतर त्या घराच्या गेटजवळ उभ्या होत्या.

---Advertisement---

दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी त्यांच्याजवळ येत आनंदभैय्या व देवरे कुठे राहतात, असे विचारून काटदरे यांना पत्ता लिहिलेली चिठ्ठी दिली. काटदरे या चिठ्ठी वाचत असताना अचानक दुचाकीवर मागे बसलेल्या युवकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत ओढली व दुचाकीवरील दोघांनी तेथून पळ काढला.

काटदरे यांनी आरडा-ओरड केली मात्र चोरटे पोत घेऊन पसार होण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात प्रतिमा काटदरे यांच्या तक्रारीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनसाखळी चोर पुन्हा सक्रिय झाले असून महिलांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---