जळगावकरांनो काळजी घ्या ! आगामी चार दिवस जिल्ह्यात पावसाचा ‘येलो अलर्ट’

मे 20, 2025 9:25 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२५ । राज्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळत आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी देखील सलग दुसऱ्या सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान, हवामान विभागाने आज संपूर्ण राज्यात पावसाचा अलर्ट जारी केला आहे. तर आगामी चार दिवस जळगाव जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.

RN 2

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि धाराशिव, लातूर या जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Image

दरम्यान जळगाव शहरासह जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी पावसाने हजेरी लावली आहे. दिवसभर असह्य उकाडा जाणवत असून सायंकाळी हवामानात बदल होऊन पाऊस कोसळत आहे. आगामी दिवस जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचे सावट राहणार आहे. हवामान खात्याने जळगाव जिल्ह्याला आजपासून २३ तारखेपर्यंत पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. या दरम्यान जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment