गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थींनीनी साजरी केली पर्यावरण पुरक धुळवड

मार्च 12, 2026 1:00 PM

अधिष्टाता,प्रशासन अधिकारी देखिल झाले सहभागी

dhulivandan godvari

जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या परिसरात गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थींनीनी पर्यावरण पुरक होळीचे दहन केले तसेच धुळवड साजरी केली यावेळी अधिष्टाता प्रशासन अधिका—यांनी देखिल सहभागी होत विदयार्थीनींचा उत्साह वाढवला.

यावेळी विदयार्थ्यांनी होळीसाठी लाकडांचा उपयोग न करता शेणाच्या गौ—यांचा वापर करत विधिवत होळीचे दहन करून व्यसन न करण्याची शपथ घेतली तर दुस—या दिवशी पर्यावरण पुरक रंगाचा वापर करीत एकमेकांना शुभेच्छा दिल्यात.

यावेळी वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके, गोदावरी नर्सिंगच्या प्राचार्य विशाखा गणविर, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरेपीचे प्रशासन अधिकारी राहूल गिरी यासह अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवत विदयार्थ्यांचा उत्साह वाढवला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now