जळगाव जिल्हा

गोदावरी नर्सिंगच्या प्रा. अश्वीनी वैद्यांचे यश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्रा.अश्विनी वैद्य यांनी भारतीय मानसोपचार सोसायटीच्या कला आणि मानसोपचार कार्यगट आयोजित राष्ट्रीय मानसिक आरोग्य पोस्टर स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत यश प्राप्त केले आहे.

जळगावच्या गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्रतिनिधित्व करताना मानसिक आरोग्य नर्सिंग विभागाच्या विभागप्रमुख प्रो. अश्विनी किशोर वैद्य यांच्यासोबत मानसिक आरोग्य नर्सिंगचे प्रथम वर्षाचे एम.एससी. नर्सिंग विद्यार्थी मि. मयुरी तिमांडे, मि. रोहिणी हरगे, आणि श्री. सूरज खवटे यांनीही भाग घेतला.दिनांक २७ ऑक्टोबर २०१६ रोजी झालेल्या या स्पर्धेत त्यांनी तिसरा क्रमांक मिळवला.त्यांना भारतीय मानसोपचार सोसायटीकडून रु. १०००/- रोख रकमेचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

मानसिक आरोग्य नर्सिंग क्षेत्रातील त्यांची समर्पण भावना आणि कौशल्य याचे हे द्योतक आहे. त्यांच्या या अभिमानास्पद यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील,उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, प्राचार्या विशाखा गनवीर, प्रशासकीय अधिकारी प्रवीण कोल्हे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button