गोदावरी फाउंडेशनतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

एप्रिल 14, 2026 3:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२६ । भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गोदावरी फाउंडेशन संचालित हॉस्पिटल, विविध महाविद्यालये आणि कार्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून महामानवाला अभिवादन करण्यात आले, यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष, पदाधिकारी, डॉक्टर, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

godavari babasaheb ambedkar jayanti
b1 1

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये आदरांजली

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे डॉ बाबा साहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्य विशाखा गणवीर, शिक्षक व विद्यार्थ्यांनी अभिवादन केले. यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महान कार्याला आदरांजली वाहण्यात आली. समता, शिक्षण व सामाजिक न्याय या विचारांनी प्रेरित होऊन सर्वांनी त्यांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प केला.

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.कार्यक्रमास प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, समन्वयक प्रा. दीपक झांबरे, प्रमुख पाहुण्या डॉ. नयना झोपे, तसेच प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व संत गाडगे बाबा यांच्या कार्याचा परिचय करून देण्यात आला. त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ग्रंथपाल प्रा. नकुल गाडगे यांनी बौद्ध वंदना सादर केली.या निमित्ताने आयोजित वक्तृत्व स्पर्धेत समीक्षा तायडे यांनी प्रथम तर शेख अल्तमश यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.प्रमुख पाहुण्या डॉ. नयना झोपे यांनी भारतीय राज्यघटना व शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे अनुकरण करावे, असे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल पाटील व डिंपल पाटील यांनी केले. हा कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला.

b2

गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, जळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्राध्यापिका अमिता निकम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्य व विचारांविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. तसेच महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले यांनी डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक व संविधान निर्मितीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल मार्गदर्शन केले.कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, teaching staff तसेच नॉन-teaching staff मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ.वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन महाविद्यालयात डॉ. आंबेडकर जयंती साजरी !

b3

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते ही त्यांची 135 वी जयंती असून विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. महाविद्यालयात यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले प्राचार्य डॉ. निलीमा वारके यांनी कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर वंदना व अभिवादन करण्यात आले.
डॉ. आंबेडकरांचे भारतीय राज्यघटनेतील योगदान, सामाजिक समता, आणि शिक्षणाचे महत्त्व या विषयांवर, तसेच त्यांच्या विचारांवर, सामान्य माणसासाठी अस्पृश्यता कमी करण्याचे काम त्यांनी केले. त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे संविधान, अर्थव्यवस्था यामध्ये बाबासाहेबांचे समाजासाठी योगदान खूप मोठे आहे. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. मानसी अहिरे यांनी केले.

b4

आज दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील कृषी व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी !

New Project 6 2

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते ही त्यांची 135 वी जयंती असून विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. महाविद्यालयात यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर वंदना व अभिवादन करण्यात आले. डॉ. प्रशांत वारके यांनी बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर भाषण दिले, तसेच त्यांच्या विचारांवर, सामान्य माणसासाठी अस्पृश्यता कमी करण्याचे काम त्यांनी केले. त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे संविधान, अर्थव्यवस्था यामध्ये बाबासाहेबांचे समाजासाठी योगदान खूप मोठे आहे. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. प्रज्ञा बाविस्कर यांनी केले.

डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये डॉ. आंबेडकर यांची साजरी

b6

गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी प्राचार्य डॉ. पंकज शर्मा यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
कार्यक्रमास डॉ. विपुल, डॉ. वसिक, डॉ. स्नेहा, डॉ. प्रतीक पाटील, डॉ. आदित्य पाटील, डॉ. भूषण, डॉ. गणेश महाजन, डॉ. समता तसेच रजिस्ट्रार डॉ. ललित महाजन यांच्यासह विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

b5

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त Dr. Ulhas Patil Medical College and Hospital येथे, मुख्य नर्सिंग अधीक्षक (Chief Nursing Superintendent) कार्यालयासमोर कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उल्हास पाटील सर तसेच डॉ. वैभव पाटील सर यांची मान्यवर उपस्थिती लाभली. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे सर्वांना बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व समजले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या कार्य व विचारांवर आधारित भाषणे सादर करण्यात आली.नर्सिंग सुपरवायझर व स्टाफ नर्स यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now