जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, जळगाव शहर महानगरपालिका व हॉकी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर शालेय नेहरू चषक हॉकी स्पर्धा १७ वर्षे वयोगटात मनपा स्तरीय स्पर्धेत गोदावरी स्कूल विजेतेपद पटकवले.गोदावरी संघाने उपांत्य सामन्यात रायसोनी स्कुलला २-० गोल ने पराभूत केले. व अंतिम सामन्यात ०-० गोल ने सामना बरोबरित सुटला.
नंतर पेनल्टी शूट मध्ये ४-३ गोलने गोदावरी संघाने ंग्लो हायस्कूलला पराभूत केले. तसेच १७ वर्ष वयोगत मूली -उपविजयी १५ वर्ष वयोगत मूले-उपविजयी ठरले. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, संचालिका डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील व प्राचार्या निलिमा चौधरी यांनी खेळाडुंचे यशाबद्दल अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र हॉकीच्या उपाध्यक्ष प्राध्यापिका डॉक्टर अनिता कोल्हे तसेच हॉकी जळगावचे सचिव फारुक शेख, गोदावरीचे प्रा. डॉ. आसिफ खान हे होते. प्रा. डॉ. आसिफ खान यांचे मोलाचे मार्गदर्शन खेळाडुंना लाभले.