बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न

जून 2, 2026 4:51 PM

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचा उपक्रम

जळगाव लाईव्ह न्यूज । स्टुडंट्स सपोर्ट अँड प्रोग्रेशन सेल आणि जीटीटी फॉउंडेशन, पुणे यांच्या सहकार्याने गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत दोन दिवसीय सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

Soft Skill Development

१ व २ जून २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमाला प्राचार्य विशाखा गणविर, प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक कॉर्पोरेट ट्रेनर व लीडरशिप कोच अक्षय भालेराव इ मान्यवरासह प्राध्यापक व कर्मचारी वृंद उपस्थीत होते. अक्षय भालेराव यांनी विद्यार्थ्यांना संवाद कौशल्ये, व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण, आत्मविश्वास वृद्धी, संघभावना, व्यावसायिक शिष्टाचार तसेच सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर याविषयी सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना आधुनिक व्यावसायिक जगातील आवश्यक कौशल्यांची माहिती मिळाली.

New Project

कार्यक्रमात आकर्षक सादरीकरणे, प्रात्यक्षिक उपक्रम, गटचर्चा, भूमिकानाट्य रोल प्ले तसेच विविध कौशल्यवर्धक कृतींचा समावेश करण्यात आला होता. सहभागी विद्यार्थ्यांनी सत्रे अत्यंत माहितीपूर्ण व प्रेरणादायी असल्याचे सांगितले. या प्रशिक्षणातून मिळालेली व्यावहारिक कौशल्ये त्यांच्या शैक्षणिक वाटचालीबरोबरच भविष्यातील व्यावसायिक जीवनातही उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालय प्रशासन, स्टुडंट्स सपोर्ट अँड प्रोग्रेशन सेल तसेच जीटीटी फॉउंडेशन यांनी सहकार्य केले.समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी मिळालेली कौशल्ये वैयक्तिक व व्यावसायिक विकासासाठी प्रभावीपणे वापरण्याचा संकल्प व्यक्त केला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now