गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या आकांक्षा, शिवप्रसादची रेल्वे रूग्णालयात नियुक्ती

नोव्हेंबर 19, 2025 4:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव येथील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे माजी विदयार्थी व अल्युमनी असोसिएशन, सदस्य आकांक्षा देबाजे, शिवप्रसाद लोखंडे यांची भुसावळ रेल्वे रूग्णालयात नियुक्ती करण्यात आलेली आहे.

akansha and shivprasad

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या २०१९ च्या बॅचचे हे विदयार्थी असून अ‍ॅल्युमनी असोसिएशनचे सदस्य देखील आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड मुबंई मार्फत आकांक्षा हीची भुसावळ रेल्वे रुग्णालयात तर शिवप्रसाद याची मध्य रेल्वे रूग्णालयात परीचारीका अधिक्षक या पदावर नियुक्ती झाली आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांनी शिक्षणकाळात माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या भाषणातून प्रोत्साहन घेत मनापासून अभ्यास करीत आपली गुणवत्ता सिद्ध केली.

त्यांना महाविद्यालयातील अनुभवी शिक्षकांनी देखील सतत मार्गदर्शन, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि प्रोत्साहन दिले. या उल्लेखनीय यशाबद्दल माजी खा.डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील सदस्या डॉ. केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील यांचेसह महाविद्यालय प्राचार्यां विशाखा गणविर तसेच सर्व शिक्षकांनी कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now