---Advertisement---
बोदवड

महानुभावपंथीयांना अंत्यविधीसाठी जागा द्या : नागरिक

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । बोदवड येथे महानुभाव संप्रदायाची ५० घरे आहेत. मात्र, महानुभाव संप्रदायासाठी अंत्यविधीची जागा उपलब्ध नाही. त्यामुळे दु:खद प्रसंगात नागरिकांची गैरसोय होते. ही समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी येथील नागरिकांनी मंगळवारी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांना निवेदन देण्यात आले.

magni

महानुभाव संप्रदायामध्ये भूमिडाग दिला जातो. महानुभाव पंथीय व्यक्तीचे देहावसन झाल्यास अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होता. त्यामुळे मंगळवारी बोदवड नगरपंचायतीचे मुख्यधिकारी आकाश डोईफोडे व नगराध्यक्ष आनंदा पाटील, गोलू बरडीया यांची नागरिकांनी भेट घेतली. तसेच स्मशानभूमीच्या जागेची समस्या लक्षात आणून दिली. दोन वर्षापूर्वी नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत झालेला जो ठराव होता, त्याची अंमलबजावणी करावी. या मागणीसाठी बोदवड येथील महानुभावपंथीयांनी प्रातिनिधिक स्वरूपात निवेदन दिले. यावेळी रतनसिंग पाटील, गणेश सोनोने, रमेश माळी, वसंत माळी, कैलास माळी आदी उपस्थित होते. पालिकेने त्वरीत दखल घेऊन ही समस्या सोडवावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---