⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

रावेर लोकसभा क्षेत्रातील राज्य मार्गांना राष्ट्रीय महामार्गांचा दर्जा द्या : खा.रक्षा खडसे

ळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२२ । रावेर लोकसभा मतदारसंघातील राज्य महामार्गांना राष्ट्रीय महामार्ग दर्जा देण्यात यावा, अशी मागणी खा.रक्षा खडसे यांनी रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यकडे दिल्ली येथे भेट घेऊन केली.

रावेर लोकसभा क्षेत्रातील नशिराबाद-सूनसगाव-कुऱ्हा-बोदवड-मलकापूर-शेगाव रस्ता, सावदा-हतनूर-चांगदेव-कोथळी-हरताळा-माळेगाव-बोदवड फाटा रस्ता, फागणे-अमळनेर-चोपडा-खरगोन (मध्यप्रदेश) रस्ता व पाचोरा-वरखेडी-शेंदुर्णी-पहुर रस्ता हे राज्य महामार्ग असून यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात दळणवळण असते. सदर रस्त्यांची स्थिती ही अत्यंत दयनीय असून सदर रस्त्यांना पाहिजे तसा निधी उपलब्ध होत नाही; त्यामुळे सदर राज्यमार्ग यांना राष्ट्रीय महामार्ग दर्जा देऊन वार्षिक आराखड्यात समाविष्ट करून निधी उपलब्ध करावा. तसेच मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या तीन राज्यांसाठी महत्वपूर्ण असलेला बुऱ्हानपूर-अंकलेश्वर हा महामार्गाच्या राष्ट्रीयकरणाला गती देण्यात येऊन तत्काळ त्यांची सुधारण करण्यात यावी. अशी मागणी केली.