⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

गिरीश महाजनांना मिळणार ‘वाय प्लस विथ एस्कॉर्ट’ सुरक्षा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२२ । राज्य सरकारने राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याच त्याचा व्यतिरिक्त ५ मंत्र्याच्या सुरक्षेत देखील वाढ होणार आहे,

राज्य सरकारने आज सहा मंत्र्यांच्या सुरक्षेतमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या मंत्र्यांना ‘वाय प्लस विथ एस्कॉर्ट’ सुरक्षा देण्यात येणार आहे. या मंत्र्यांमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, कामगार मंत्री सुरेश खाडे, बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, सहकार मंत्री अतुल सावे, महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा समावेश आहे. या सहा मंत्र्यांना आता यापुढे वाय प्लस विथ एस्कॉर्ट सुरक्षा पुरविण्यात येणार आहे.

राज्य सरकारने अलीकडेच महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली होती. यानंतर आता राज्य सरकारमधील सहा मंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. हे सर्व मंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत