जळगाव जिल्हाराजकारण
४ जूनच्या निकालानंतर संजय राऊतांना रुग्णालयात दाखल करावा लागेल ; मंत्री महाजनांचा घणाघात
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२४ । शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावर दावा केला असून यामुळे राजकारणात वादळ उठलंय. भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केला असून गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांनी रसद पुरवली असं संघाचे लोक सांगतात, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. आता यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊतांवर घणाघात केला आहे.
जळगाव: संजय राऊत यांना ४ जूनला निकाल लागल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयातच दाखल करावा लागेल. त्यांचे डोकं तपासावे लागेल. आता तेवढेच राहिलं आहे, अशी टीका मंत्री गिरीश महाजनांनी केली.