---Advertisement---
जळगाव शहर राजकारण

आता दुकानदारी बंद करा : गिरीश महाजनांची खडसेंवर टीका

eknath khadse girish mahajan
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२१ । माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknathrao Khadse) यांच्यातील शाब्दिक वार अद्यापही सुरू आहे. बोदवड येथील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर जोरदार टीका केलीय. खडसे मतदारांना सांगतात, गिरीशभाऊंना मोठं केल. मला कुणी मोठं केलं नाही विकासकामांमुळे मी मोठा झालो. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीसाठी पळतो, अन् स्वतःच्या मतदारसंघाचा विकास मात्र भकास आणि म्हणे मोठा नेता, आता तुमचं खरं नाही दुकानदारी बंद करा असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला.

eknath khadse girish mahajan

सध्या महाराष्ट्रात नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत काही दिवसापूर्वी एकनाथराव खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान गिरीश महाजन यांनी देखील टीका केली.

---Advertisement---

आता तुमचं खरं नाही दुकानदारी बंद करा
गिरीश महाजनं यांनी 15 वर्ष लाल दिव्याची गाडी अन् 12 खाते मिळाले. आणि तरीही एकनाथ खडसे मतदारसंघाचा विकास करू शकले नाही. चुकीच्या वागणुकीमुळे लोकांनी तुम्हाला शिक्षा दिलीय. कमिशनसाठी लल्लु पंजु भांडतात आणि कसा विकास होईल. आता कितीही आवाज चढवला तुमची धार बोथट झाली आहे. आता तुमचं खरं नाही दुकानदारी बंद करा असा टोला देखील महाजनांनी एकनाथ खडसेंना लगावला.

शेरोशायरी करता स्वत:ला तुम्ही सव्वाशेर म्हणवून घेतात ते तुम्हाला लिहून देताना तुम्ही वाचतात. तुमचं हेच का आता की तुम्ही शेरो शायरी करावी. मात्र, आता तुमचा दबदबा राहिलेला नाही. तुम्ही सव्वाशेर नाही आता पावशेर झाले असल्याचा टोलाही महाजनांनी खडसेंना लगावला.

एकनाथ खडसे मतदारांना सांगतात, गिरीशभाऊंना मोठं केल. मला कुणी मोठं केलं नाही विकासकामांमुळे मी मोठा झालो. लोकांची कामे करावी लागतात. लोकांची सेवा केली म्हणून आतापर्यंत लोकांनी निवडून दिलं. कमीत कमी 25 हजार च्या लीड ने निवडून दिलं आहे. मी आतापर्यंत कधी पंचवीस हजाराच्या खाली आलो नाही. तुम्ही तर कधी अठराशे रुपये अठराशे मताने कधी आठ हजार मतांनी असे निवडून आले आहेत, असं देखील गिरीश महाजन म्हणाले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---