गिरीश महाजनांचा नाथाभाऊंच्या मुलाच्या निधनाबाबत खळबळजनक विधान; काय म्हणाले?

जुलै 22, 2025 11:46 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२५ । हनी ट्रॅप प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. भाजपमध्ये सामील झालेल्या प्रफुल्ल लोढावर बलात्कार आणि हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रफुल्ल लोढा आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचे पूर्वापार घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप केला आहे. खडसेंनी केलेल्या आरोपांनंतर मंत्री महाजन यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

eknath khadse girish mahajan jpg webp

यावेळी त्यांनी प्रफुल लोढा याचेच नाव घेत एकनाथ खडसे यांच्या मुलाच्या मृत्यूबाबत मोठा दावा केलाय. खडसे यांच्याबद्दल काय बोलावं. त्यांना सर्वदूर अपयश आलेलं आहे. ते सत्तेपासून दूर फेकले गेले आहेत. भाजपमध्ये येण्यासाठी त्यांनी लोटांगण घातले. मात्र त्यांना पक्षात कोणीही घेतले नाही, अशी खोचक टीका गिरीश महाजन यांनी केली.

निखिल खडसे यांच्या मृत्यूप्रकरणाचीही…

सर्व आजारपण आणि सर्वदूर अपयश यामुळे हा माणूस द्वेष भावनेने पछाडलेला आहे. थोडा वेळ द्याल तर मी एकनाथ खडसे यांच्यासोबत चे प्रफुल लोढा यांचेसुद्धा फोटो दाखवतो. त्यामुळे एकनाथ खडसे यांची मानसिकता खराबच झालेली आहे, असा हल्लाबोल महाजन यांनी केला. निखिल खडसे यांनी ज्यावेळी आत्महत्या केली, त्यावेळी हाच प्रफुल लोढा बोलला होता. काय काय बरगळला होता. आता खडसे म्हणतात प्रफुल लोढा यांची एसआयटी चौकशी करा. असे असेल तर निखिल खडसे यांच्या मृत्यूप्रकरणाचीही चौकशीचीही प्रफुल लोढा याने मागणी केली होता, असा संदर्भ महाजन यांनी दिला.

तसेच, एकनाथ खडसे यांच्या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला होता हे समोर आलं पाहिजे. खडसेंनीच त्यांच्या मुलाचा खून केला म्हणून असं याच लोढा यांने सांगितलेलं आहे, असा मोठा आणि गंभीर गौप्यस्फोट महाजन यांनी केला.त्यावेळी मी एकनाथ खडसे यांच्यासोबतच राहत होतो. मला त्याबद्दल बोलायचं नाही. मी त्या लेव्हलचा माणूस नाही. पण त्यांनी बोलताना थोडं तारतम्य बाळागलं पाहिजे, असा सल्लाही पुढे गिरीश महाजन यांनी खडसे यांना दिला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now