कोण ओळखतो त्या खडसेंना? मंत्री गिरीश महाजनांनी नाथाभाऊंना पुन्हा डीवचले, नेमकं काय म्हणाले?..

नोव्हेंबर 18, 2025 12:18 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२५ । मुक्ताईनगर शहरात आपल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची ताकद कमी असल्यामुळे आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवणार नसल्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. यावरून आता मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर बोचरी टीका केलीय.

girish mahajan eknath khadse

‘कोण ओळखतो त्या खडसेला?’ असं म्हणत मुक्ताईनगरमध्ये त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला ते बरोबरच बोलले आहे. काय चुकीचं त्यांनी म्हटलं. एकनाथ खडसे एवढे मोठे बलाढ्य नेते आहेत त्यांनी एक तरी नगरपालिका निवडून आणली असती, असं म्हणत खडसेंना मंत्री गिरीष महाजन यांनी डिवचलं आहे.

“खडसे सध्या कोणत्या पक्षात आहेत हे कळत नाहीत. खडसेंबाबत आता बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही. मुक्ताईनगरमध्ये आमचे मित्र पक्ष चंद्रकांत पाटील हे वेगळं लढतायत. एकनाथ खडसे लोकसभेला म्हणतात सुनेला मदत केली. प्रत्येक निवडणुकीला खडसे हे आपली भूमिका बदलत असतात. एकमेकाला शिव्या द्यायच्या आणि घरातल्या घरात राजकारण करायचं” अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.

“आता खडसेचं काही राहिलेलं नाही. जिल्ह्यात निकाल लागल्यावर कोणाची किती ताकत आहे, उबाठाची किती ताकद आहे? काँग्रेसची किती ताकद आहे? आणि शरद पवार पक्षाची किती ताकद आहे हे कळेल. खडसेंनी जिल्ह्यातील एखादी तरी नगरपालिका निवडून आणून दाखवावी” असं गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना आव्हान दिलं.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now