⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | गोदावरीच्या गीत गोविंद मैफीलीत रसिक चिंब भिजले…

गोदावरीच्या गीत गोविंद मैफीलीत रसिक चिंब भिजले…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२४ । गोदावरी संगीत महाविद्यालयात ’गित गोविंद’ या सुरेल मैफिलीच्या दे रे कान्हा’, ’आज गोकुळात रंग, अरे मन मोहना’ या सारख्या गीतांनी रसिक चिंब भिजले. गितांना मन प्रसन्न करणारे नृत्य व हार्मोनियम आणि तबला वादनाची सुरेल जोड मिळाल्याने मैफील बहरत गेली. दि. १५ जून २०२४ रोजी सायं. ६.०० वा गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजीत मैफीलीचे उदघाटन दिपप्रज्वलनाने झाले.

अध्यक्षस्थानी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड.सुशिलजी अत्रे, विजय कृष्णकुमार (मुंबई), श्रीमती गोदावरीआई पाटील, संचालिका डॉ. वर्षा पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. केतकीताई पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. पद्मजा नेवे, कथक विभाग प्रमुख डॉ. महिमा मिश्रा, श्री. प्रविण महाजन, देवेंद्र गुरव, सुशिल महाजन, केंद्र व्यवस्थापक राजु पाटील व महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद व पालक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

सुरुवात गायन विभागाचे ’माझ्या मना लागो छंद’ या भक्ती गीताने झाली, ’नारायणा रमा रमणा’ हे नाटय गीत तर देरे कान्हा, ’कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी’ ही गवळण ’वृंदावणी वेणू’ हे ’अग नाच नाच राधे’ अनुक्रमे ऋतुराज जोशी नाजनीन शेख व निकीता जोशी,प्रणव ईखे,देवेश महाजन यांनी सादर केले. गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या कथक विभाग प्रमुख डॉ. महिमा मिश्रा अय्यंगार लिखीत महाराज कृष्णकुमार : व्यक्तीत्व और कृतित्व या पुस्तकाचे विमोचन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळस महाराज कृष्णकुमार यांचे सुपुत्र विजय कृष्णकुमार (मुंबई) यांची उपस्थिती लाभली.

यांनतर कथक विभागाच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण गोविंद हरे मुराली हे बहारदार नृत्य सादर केल तर, निरतत थुंग विरजु महाराज यांची बंदीश सादर केली. ’घागर घेवून निघाली’ ही गवळण तर किती सांगू मी सांगु कुणाला’ यांनतर नंद किशोरा, झुलतो बाई रास झुला, गोकुळात रंग इ गिते अनुक्रमे राजस्वी चव्हाण, नमस्वी पाटील, आरुषी अदनाने पूर्वी जगताप,रिया वर्मा, कनकश्री अय्यंगार, समृध्दी जोशी, गित साळवे व मित साळवे या चिमुकलींनी आपल्या मधुर आवाजात सादर केली.वेदिका झारे, आर्या सोनार, राधीका पाटील, मंजिरी जोशी, कनकश्री अय्यंगार, तुलसी महाजन, अथर्व पाटील, गित साळवे प्रज्ञा कोळी, मित साळवे, जागृती कोळी, वैष्णवी जोशी व यशश्री ठाकुर साक्षी पाटील, ईशा चिंचाळे, अलका खैरनार,राजश्री पाठक,किरण सोनी, प्रियंका महाजन, अनिता सुर्यवंशी,स्मिता पाटील यांनी सादर केली.तबला विभागाचे तुषार महाजन, तेजस महाजन, दिनेश जोशी, प्रज्वल जगताप यांनी तबला वादनाचे बोल सादर केले. तर हार्मोनियम विभागाची विद्यार्थीनी संस्कृती जोशी हीने संवादिनीवर राग तिलक कामोद सादर केला. यांनतर अरे मन मोहना’ हे गीत खुशी पांडे, तर भोर भोये पनघट पे हे गीत नाजनीन शेख यांनी सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली अशा एकाहून एक अशी सुरेल अशी राधा-कृष्ण यांनी गीते सादर करुन जणू काही कार्यक्रमात मृगसरीच बरसविल्या. कार्यक्रमास साथसंगत म्हणून तबला- प्रविण महाजन, ढोलक- देवेंद्र गुरव तर हार्मोनियम- सुशिल महाजन यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्या सौ. पद्मजा नेवे यांनी केले. सुरेल असे सुत्रसंचालन वैष्णवी जोशी व यशश्री ठाकुर यांनी तर आभार प्रदर्शन श्री. भुषण खैरनार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. राजु पाटील, अनंता साठे, किशोर चौधरी, ईश्वर पाटील, भुषण पाटील यांनी परिश्रम घेतले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.