जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२४ । रावेर तालुक्यातील पाल येथे एकाला गावठी देशी बनावटीच्या पिस्तुलासह पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भरत गणेश सोनवणे (वय 32 वर्ष रा.वडोदा ता यावल) असं अटक केलेल्याचे नाव असून याबाबत रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे घटना?
पाल येथे एक संशयीत इसम गावठी पिस्टल घेवून मध्यप्रदेश राज्यातुन पाल गावातुन महाराष्ट्रात प्रवेश करणार असल्याची गोपणीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील पाल दुरक्षेत्र अंतर्गत पाल ते खरगोन रस्त्यावरील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या नाकाबंदी येथे जावून कार्यवाही करण्याचे आदेश मिळाले होते. यावेळी पोलिसांचे पथक कार्यवाही करत होते.
२६ ऑक्टोबर रोजी रात्रीच तात्काळ पाल येथे रवाना होवून शेरी नाका येथील नाकबंदी येथे थांबलो असतांना रात्री 03.50 वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीप्रमाणे पेहराव केलेला इसम गावठी देशी बनावटीचे पिस्तुल विनापरवाना बेकायदेशीर रित्या त्याच्या कब्जात बाळगतांना मिळुन आला.
सदर इसमास ताब्यात घेवून त्याची पंचा समक्ष अंग झडती घेतली असता त्याच्या जवळ गावठी बनावटीच्या १ रिव्हाल्वर 10,000/- रु किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यावरुन नामे भरत गणेश सोनवणे यास ताब्यात घेवुन त्याच्याविरुद्ध पोकों/समाधान कौतीक ठाकुर यांच्या फिर्यादीवरुन रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदशनाखाली पोउनि तुषार पाटील हे करीत आहे.
यांनी केली कारवाई
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अशोक नखाते, अपर पोलीस अधिक्षक जळगांव, सहाय्यक पोलीस अधिक्षक फैजपुर अन्नपूर्णा सिंह, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उप निरीक्षक तुपार पाटील, पोहेको संजय मेढे (चालक), पोकों/समाधान ठाकुर, सचिन घुगे, प्रमोद पाटील, पोकों विकार शेख, यांच्या पथकाने कार्यवाही केली आहे.