⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

पंखीडा ओ पंखीडा.. यंदा गरबा खेळायला परवानगी पण..

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२१ । यंदाच्या यनवरात्रोत्सवात गरबा खेळण्या बाबद राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. गरबा खेळण्यासाठी परवानगी आहे पण गरबा खेळताना सामाजिक अंतर पाळणे व मास्क वापरणे अतिशय गरजेचे आहे.

 

कोविड स्थितीमुळे राज्यात गेल्यावर्षी नवरात्रोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला होता. प्रत्यक्ष दर्शनास तसेच गरबा खेळण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली होती. यंदाही नवरात्रोत्सवासाठी स्थानिक पातळीवर प्रशासनांकडून नियमावली जारी करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा गरबा खेळता येणार का, याकडे गरबाप्रेमींचे लक्ष लागले आहे. अशा सर्वांसाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आनंदाची बातमी दिली आहे. अटी आणि शर्ती पाळून गरबा खेळता येईल, असे टोपे यांनी स्पष्ट केले आहे.