⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | गणेशोत्सव : सावद्यात वीज वितरणातर्फे वायरींचे जाळे दूर!

गणेशोत्सव : सावद्यात वीज वितरणातर्फे वायरींचे जाळे दूर!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२२ । सावदा येथे गणेशोत्सवाचे पार्श्वभूमीवर वीज वीतरण तर्फे गणपती मार्गावर असलेल्या विजतार वायरी नुकत्याच उचं करण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सदर वायरी विसर्जन मिरवणुकीसाठी अडथळा ठरत होत्या, त्या हटविण्यात व ऊंच करण्यात आल्या आहे. त्यामुळे आता मिरवणूक मार्ग अधिक सुकर होणार आहे

यंदा सावदा शहरात अनेक मंडळांनी कोरोनानंतर सूट मिळाल्यावर आता मोठ मोठ्या मुर्त्या स्थापनेसाठी आणल्या आहेत. काही मंडळांनी सुमारे 22 ते 25 फूट उंच मुर्त्या आणल्या असून विसर्जन मिरवणुकीत या वायरी मुळे कोठेही अडचण अथवा अडथळा येऊ नये, म्हणून वीज वितरण तर्फे शहरातील सर्व मुख्य मार्गावरील वायरींचे जाळे दूर करण्यात आल आहे. यावेळी वीज वितरणाचे कर्मचारी गोपाळ चव्हाण, भूषण नेमाडे, प्रवीण साळी गिरीष कापडे, दिपक नेमाडे, तेजस जाधव आदींनी परिश्रम घेतले. या कामामुळे आता मिरवणूक मार्ग अधिक सुकर होणार आहे

author avatar
टीम जळगाव लाईव्ह