जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२२ । अमळनेर तालुक्यातील बाम्हणे विकासो च्या चेअरमनपदी गणेश धर्मराज भामरे तर व्हाईस चेअरमनपदी बारीकराव अंबर पाटील यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी पराग शाम पाटील, धनराज गंभीर पाटील, यादव हरी सनेर, वसंत अभिमन पाटील, शांताबाई यशवंत पाटील, कलाबाई हिरालाल पाटील, युवराज नामदेव पाटील, नवल हिम्मत पाटील व देविदास दगा पाटील हे सदस्य उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर.यु.पाटील यांनी काम पाहिले तर सचिव कैलास पाटील यांनी त्यांना सहकार्य केले.
यावेळी विजय लोटन पाटील, हिरालाल बाबुराव पाटील, चंद्रकांत पोपट पाटील, प्रविण ओंकार पाटील, भिकन बारिकराव पाटील, संतोष लक्ष्मण पाटील, राजेंद्र अभिमन पाटील, यशवंत पोपट पाटील, जगदीश भगवान पाटील, रमेश विनायक पाटील, आधार बळीराम पाटील, दत्तात्रेय वामन पाटील, दिनेश पंडित पाटील, संजय लोटन पाटील, सुनिल गुलाबराव पाटील, मोतीलाल बाजीराव पाटील, दिनेश हिरालाल पाटील, किशोर हिम्मतराव पाटील, रविंद्र मिस्तरी, भैय्यासाहेब मन्साराम पाटील, नितीन पाटील, रमेश पंडित पाटील, सुनिल पाटील, अमृत पाटील, दिनेश यशवंत पाटील, मधुकर पाटील, कैलाश पाटील, देविदास नेरकर, दुर्योधन नेरकर, संजय पाटील, प्रकाश पाटील, विनोद पाटील यांच्या सह ग्रामस्थ मंडळींचे अनमोल सहकार्य लाभले. आमदार अनिल भाईदास पाटील,माजी आमदार स्मिताताई वाघ,भाजपाच्या जेष्ठ नेत्या ऍड.ललिता पाटील, जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई पाटील,मार्केट च्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील,पंचायत समितीचे उपसभापती भिकेश पाटील,काँग्रेसच्या शेतकरी आघाडीचे सुभाष सुकलाल पाटील,कृऊबा माजी संचालक पराग पाटील,भाजपा चे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील तसेच धुळे काँगेसचे नेते व महिंदळे चे सरपंच दिनेश पाटील यांनी गणेश भामरे यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
सहकारातील युवा नेतृत्व
केशवा आयटी व्हिजन चे संचालक गणेश भामरे यांनी मागील काही काळापासून सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटवलेला आहे,बाम्हणे ग्रामपंचायतीचे ते विद्यमान सदस्य असून २०११ ते २०१६ दरम्यान त्यांनी विकासो च्या संचालक पदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळलेली आहे.