बुधवार, नोव्हेंबर 29, 2023

अखेर बहुचर्चित ‘गदर 2’ चा ट्रेलर रिलीज!

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२३ । अभिनेता सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा बहुचर्चित ‘गदर 2’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

१ मिनिटं ९ सेकंदाच्या या टीजरमध्ये सनी देओलची ऍक्शन आणि इमोशनल बाजू दाखविण्यात आली आहे. अमीषा पटेल आणि चित्रपटातील त्यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा दोघेही टीजरमधुन वगळण्यात आले आहे.

गदर २ च्या टीजरची सुरूवात व्हॉइस ओव्हरने होते. एका महिलेचं आहे आवाज असून ‘पाकिस्तान के दमाद है ये, इन्हे नारियल दो. नहीं तो पूरा पाकिस्तान दहेज़ में लेके जायेंगे जनाब’ असं ती म्हणते. त्यानंतर पाकिस्तानात भारताविषयी असलेला असंतोष दाखविण्यात आला आहे. ‘अगला जुम्मा दिल्ली में होगा’ अशा घोषणा देताना लोक दिसत आहेत.

त्याचवेळी या टीझरच्या शेवटी तारा सिंह रडताना दिसत आहे. हा टीझर रिलीज होताच चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. २२ वर्षांपूर्वी गदर एक प्रेमकथा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. भारत-पाकिस्तान वेगळा झाल्यानंतरची लव्हस्टोरी प्रेक्षकांना खूप आवडली होती. तसेच आताही आवडत आहे. सकिना आणि तारा सिंग पुन्हा हिट ठरत आहे.

Gadar 2 Teaser | In Cinemas 11th August | Sunny Deol | Ameesha Patel | Anil Sharma | Zee Studios