⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | बातम्या | ‘गदर 2’ने रचला इतिहास! स्वातंत्र्यदिनी बंपर कमाई करून मोडले विक्रम

‘गदर 2’ने रचला इतिहास! स्वातंत्र्यदिनी बंपर कमाई करून मोडले विक्रम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२३ । हिंदुस्तान जिंदाबाद है.. जिंदाबाद था और जिंदाबाद रहेगा.. या डायलॉगने पुन्हा एकदा संपूर्ण भारतीय नागरिकांना अक्षरश: वेड लावलं आहे. तब्बल 22 वर्षांनंतर पुन्हा एकदा तारा सिंग आणि सकिनाच्या अनोख्या लव्हस्टोरीचा एक नवीन टप्पा ‘गदर 2’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

सनी देओलचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दररोज रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. पण पाचव्या दिवशी चित्रपटाने केलेले कलेक्शन चित्रपट समीक्षकांच्या कल्पनेपलीकडचे आहे. गदर 2 ने स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीत बंपर कमाई करून अनेक विक्रम मोडले. गदर 2 ने स्वातंत्र्यदिनी जबरदस्त कलेक्शन करून इतिहास रचला आहे. काल या चित्रपटाने 55 कोटींचे धमाकेदार कलेक्शन केले आहे.

पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी 40 कोटींच्या दणक्यात खाते उघडणाऱ्या गदर 2 ने दुसऱ्या दिवशी 43.08 कोटी कमावले. रविवारी तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 51.7 कोटींची कमाई केली.चौथ्या दिवसाची कमाई 38.7 कोटी होती. पाचव्या दिवसाच्या व्यवसायातून गदर 2 ने बॉक्स ऑफिस कलेक्शन किती जबरदस्त आहे हे सिद्ध केले. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, गदर 2 ने मंगळवारी (5 व्या दिवशी) 55 कोटींची कमाई केली. यासह चित्रपटाचे एकूण 5 दिवसांचे कलेक्शन 228 कोटी झाले आहे.

बाहुबली आणि सुलतानला टाकलं मागे
कमाईच्या या दमदार आकड्यांसह सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्या ‘गदर 2’ने प्रभासच्या बाहुबली 2, सलमान खानच्या सुलतान आणि हृतिक रोशनच्या वॉर या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. पाचव्या दिवशी बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘गदर 2’ हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. याआधी शाहरुख खानच्या ‘पठाण’ने 58.5 कोटी रुपयांची कमाई केली होती.

सनी देओलचा ‘गदर 2’ ठरणार ब्लॉकबस्टर
‘गदर 2’ची कमाई ज्या गतीने होत आहे, ते पाहून हा चित्रपट लवकरच ब्लॉकबस्टर ठरू शकतो, अशी शक्यता चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तवली आहे. या चित्रपटाच्या कमाईचे आकडे आता फक्त शाहरुखच्या ‘पठाण’पासून काही अंकांनी दूर आहेत. या वर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘गदर 2’ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.