उद्धवा अजब तुझे सरकार.. मुक्ताईचरणी १० मिनिटांसाठी निधी आलाही आणि गेलाही
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । राज्य शासनाने मुक्ताईनगर येथील श्री संत मुक्ताई मंदिराच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र आखाड्यातील विकास कामासाठी 5 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र हा निधी खर्च करण्याची मुदत फक्त दहा मिनिटेच होती. अर्थात एवढ्या कमी वेळेत हा निधी जिल्हा प्रशासनाला वापरता आला नाही आणि म्हणून तो परत गेला.
संत मुक्ताई मंदिर मुक्ताईनगर विकासाकरिता अनुदान आणि सहाय्यक अनुदान या लेखाशीर्षका अंतर्गत ५ कोटी ६० लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता. मात्र खर्च करण्यासाठी फक्त दहा मिनिटेच मुदत देण्यात आली होती रात्री 11 वाजून ५० मिनिटांनी हा निधी दिल्यामुळे अधिकाऱ्यांना १० मिनिटात त्यावर काय कारवाई करावी हे समजले नाही आणि हा निधी.
कोथळीच्या मंदिरासाठी १ कोटी ६० लाख रुपयांच्या निधीची तरतूद असलेल्या विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली होती. त्यासाठी 4 कोटी रुपये निधी याआधी जिल्हाधिकार्यालय कारे करण्यात आला होता. त्यानंतर पाच कोटी रुपयांच्या निधी शासनाने वितरीत केला नव्हता.