⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहरातील रस्त्यांसह विविध कामांसाठी 25 कोटींच्या निधीला मंजुरी ; आमदार भोळेंच्या प्रयत्नांना यश

जळगाव शहरातील रस्त्यांसह विविध कामांसाठी 25 कोटींच्या निधीला मंजुरी ; आमदार भोळेंच्या प्रयत्नांना यश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२४ । जळगाव शहरातील आणखी ६८ रस्ते तसेच ओपन स्पेस सुशोभिकरण व स्ट्रीट लाईट पोल बसविण्याच्या कामाला २५ कोटींच्या निधीला नगरविकास विभागातर्फे मंजुरी मिळाली असून शहरातील विकास कामांसाठी आमदार सुरेश भोळे यांच्या प्रयत्नांनी हा निधी प्राप्त झाला आहे.

यातून रस्ते कॉक्रिटीकरण,ओपन स्पेस सुशोभिकरण, शहरात प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील विकास कामांच्या निधी मंजुरी करिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. त्याबद्दल आमदार सुरेश भोळे यांनी त्यांचे आभार मानले आहेत

ओपन स्पेसचे सुशोभिकरण नगरविकास विभागाकडून शहरातील विकास कामांसाठी मंजूरी मिळालेल्या निधीतून शहरातील प्रभाग १० मधील ओपन स्पेसला चेनलिंक फेन्सिंग करणे तसेच प्रभाग क्र. ९ मधील शंकरअप्पा नगरातील ओपनस्पेस मध्ये सभागृह बांधण्याचे काम होणार आहे. तर प्रभाग क्रमांक २,३,४,७,८,९,१०,११, १३ व १४ येथे अकरा ठिकाणी प्रकाश योजनेसाठी स्ट्रीट लाईट बसवले जाणार आहे. अजून ६८ रस्ते काँक्रीटचे होणार शहरात अनेक प्रभागांमधील मुख्य रस्ते काँक्रीट झाले आहे. तसेच काही रस्त्यांचे कामे सुरू आहे. यात ६८ रस्त्यांची अजून भर पडणार असून हे रस्ते काँक्रीट होणार आहे. यात प्रभाग क्रमांक १४,१६,१२,१३,८ व १० मध्ये ६८ रस्ते या निधीतून होणार आहे

शहरातील अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तर काही रस्त्यांची कामे प्रगती पथावर आहेत. महापालिका कर्ज मुक्त्तिपासून ते शहरातील विकास कामांसाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. शहरात बरीच कामे बाकी असून ती आगामी काळात पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार आहे.
-सुरेश भोळे, आमदार

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.