खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीसह साथीदार जेरबंद; दोन कट्टे व आठ तलवारी जप्त

मार्च 25, 2026 11:07 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी धनंजय उर्फ धीरज दत्तू कोळी (वय २०, रा. पाळधी, ता. धरणगाव) याच्यासह अजय मारुती डोळे अजय मारुती डोळे (वय २३, रा. नेरी दिगर, ता. जामनेर) या दोघांच्या जिल्हापेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. दोघांकडून दोन गावठी कट्टयांसह आठ तलवारी हस्तगत करण्यात आल्या, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली

vsd

​रामानंद नगर पोलीस ठाण्यातील खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी धीरज कोळी हा जळगाव शहरात फिरत असल्याची गुप्त माहिती जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या एका विशेष पथकाने आर.आर. शाळेच्या बाजूला असलेल्या गल्लीत सापळा रचला.

यावेळी दुचाकीवरून जाणाऱ्या संशयितांना अडवले. चौकशीदरम्यान मुख्य आरोपी धीरज कोळी आणि त्याचा साथीदार अजय डोळे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या झडतीत सुरुवातीला एक तलवार आणि एक गावठी कट्टा आढळून आला.

​​न्यायालयाने दोन्ही आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या दरम्यान धीरज दत्तू कोळी आणि अजय डोळे याची सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडील आणखी एक गावठी व ७ तलवारी जप्त करण्यात आल्या. या कारवाईत पोलिसांनी १ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यात ६० हजार रुपयांचे दोन कट्टे, ४० हजार रुपयांच्या आठ तलवार आणि १५ हजार रुपयांची दुचाकी यांचा समावेश आहे.अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी धीरज कोळी याच्यावर यापूर्वी धरणगाव आणि रामानंद नगर पोलीस ठाण्यात मारामारी, आर्म्स ॲक्ट आणि खूनाचे प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने हा गावठी कट्टा विक्रीसाठी आणला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.​

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now