नगरदेवळा येथे रविवारी मोफत आरोग्य तपासणी
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२२ । नगरदेवळा – बाळद जिल्हा परिषद राष्ट्रवादी गट व गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष्य रुग्णालयातर्फे शिवजयंतीनिमित्त येत्या रविवारी (दि. 27) रोजी सरदार एस.के. पवार हायस्कूल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे.
या शिबिरात डायबिटीज, ब्लडप्रेशर, थायराइड, लहान मुलांचे आजार, महिलांच्या गर्भपिशवीचे आजार, मासिक पाळी संबंधीच्या समस्या, महिलांच्या स्तनाचे आजार, पोटाचे आजार, मुळव्याध भगंदर, आतड्यांचे आजार, अशक्तपणा, घेरी येणे, डोळ्यांचा लालसरपणा, नजर कमी होणे, डोळ्यातून पाणी गळणे, यासह डोळ्यांचे विविध आजार, मोतीबिंदू, हिरड्यांचे आजार, स्नायुंचे दुखणे, गुडघे व सांधेदुखी संबंधी आजार, अशा विविध आजारांची मोफत तपासणी होणार आहे.
तज्ञ डॉक्टरांची टीम
सर्व आजारांची तपासणी ;त्या’ ‘त्या’ आजारांच्या तज्ञांकडून केली जाणार आहे. या डॉक्टरांच्या टीममध्ये डॉ. मनोज पाटील (न्यूरोसर्जन), डॉ. वैभव गिरी (श्रीरोग तज्ञ), डॉ. अमित भंगाळे (किडनी विकार तज्ञ), डॉ. तेजस पाटील (अस्थिरोग तज्ञ), डॉ. श्रीराज महाजन (प्लास्टिक सर्जन), डॉ. प्रियंका पाटील (श्रीरोग तज्ञ), डॉ. अतुल भारंबे (कॅन्सर सर्जन), डॉ स्वप्नील गिरी (बालरोग तज्ञ), डॉ. अनुश्री व्ही (फिजिशियन), डॉ. अतुल सोनार (पॅथॉलॉजिस्ट), डॉ. अभिजीत पाटील (अस्थिरोग तज्ञ), डॉ. अमित नेमाडे (फिजिओथेरपिस्ट), डॉ. नीरज चौधरी (मूत्र विकार तज्ञ), डॉ. अश्विनी चव्हाण (दंतरोग तज्ञ), डॉ. रोहन पाटील (जनरल सर्जन), डॉ. अनंत व्ही पाटील (पंचकर्म तज्ञ) व डॉ. वृषाली पाटील (नेत्ररोग तज्ञ) हे रुग्णांची तपासणी करणार आहेत. नगरदेवळा – बाळद परिसरातील नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवकर रूग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
- गोदावरी अभियांत्रिकीत आज स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन
- जळगावात दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा मुदतबाह्य साठा नष्ट ; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
- जळगावात मांजा विक्रीसह वापर करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; ८ जण ताब्यात
- ग्राहकांना दिलासा ! मकर संक्रांतीनंतर जळगावच्या सुवर्णपेठेत सोने-चांदीचा भाव घसरला..
- खेळामध्ये सांघिक भावना असणे खूप महत्वाचे : आ. राजूमामा भोळे