⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आज मोफत आरोग्य तपासणी शिबिर

पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आज मोफत आरोग्य तपासणी शिबिर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात २१ रोजी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिराचे आमदार किशोर पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भीमाशंकर जमादार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या वेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे, विघ्नहर्ता मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भूषण मगर, डॉ. सागर गरुड, डॉ. योगेश सोनवणे, डॉ. पंकज नानकर, डॉ. अमित वाघ, डॉ. राहुल पटवारी, डॉ. विजय पाटील व गोदावरी हॉस्पिटलची तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम विविध आजारांची तपासणी व निदान करणार आहेत. तर गरज लागल्यास जीवनदायी आरोग्य योजनेद्वारे खासगी रुग्णालयात उपचार केला जाणार आहेत. आरोग्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे डॉ. समाधान वाघ व डॉ. अमित साळुंखे यांनी कळवले आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह