जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२५ । भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. भुसावळ विभागातील पाचोरा येथे यार्ड रीमॉडेलिंगच्या कार्यानिमित्त प्री-नॉन इंटरलॉकिंग (फेज दोन) आणि नॉन इंटरलॉकिंग कार्यासाठी आज शनिवारी १ फेब्रुवारी ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामांमुळे चार रेल्वे गाड्या रद्द करण्यात येणार आहे. तर मंगळवारी (दि. ४) तीन गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावणार आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

आज या गाड्या रद्द
आज शनिवारी (दि. १) गाडी क्रमांक ०१२११ बडनेरा-नाशिक एक्सप्रेस, गाडी क्रमांक ०५२१२ नाशिक-बडनेरा एक्सप्रेस, गाडी क्रमांक ११११३ देवळाली-भुसावळ एक्सप्रेस, गाडी क्रमांक ११११४ भुसावळ-देवळाली एक्सप्रेस रद्द करण्यात आली.
तर मंगळवारी (दि. ४) रोजी गाडी ०१२११ बडनेरा-नाशिक एक्सप्रेस, गाडी ०९२१२ नाशिक-बडनेरा एक्सप्रेस, गाडी क्रमांक ११११३ देवळाली-भुसावळ एक्सप्रेस, क्रमांक ११११४ भुसावळ-देवळाली एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तर मंगळवारी (दि. ४) १२८५९ मुंबई-हावडा गीतांजली एक्सप्रेस मुंबई येथून दोन तास उशिराने सुटेल. तर २२१२९ लोकमान्य टिळक टर्मिनस-अयोध्या कैंट एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दोन तास उशिराने सुटेल. १५०१७ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपुर एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून एक तास उशिराने सुटणार आहे. प्रवाशांनी या सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.