जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२४ । रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. भुसावळ विभागातील भुसावळ-बडनेरा दरम्यान बोदवड स्टेशन येथे जुना पादचारी पूल रेल्वे क्रेनद्वारे काढण्यात येणार आहे. या कामाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून विशेष ब्लॉक ५ व ६ सप्टेबर रोजी घेण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे चार रेल्वे गाड्या रद्द केल्या आहे.
भुसावळ विभागातील मध्य रेल्वेतील भुसावळ विभागातील बोदवड येथे रेल्वेने बोदवड येथील जुना पादचारी पूल काढण्यासाठी ब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक ५ व ६ सप्टेंबरला राहणार आहे. यामुळे या मार्गावरील चार रेल्वे गाड्या रद्द केल्या आहे.
यात गाडी क्रमांक ०९२११ बडनेरा – नाशिक विशेष एक्सप्रेस, गाडी क्रमांक ०१२१२ नाशिक-बडनेरा विशेष एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १११२१ भुसावळ वर्धा एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक १११२२ वर्धा-भुसावळ एक्सप्रेस या चार गाड्या दोन दिवस रद्द राहणार आहे.