जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२२ । तालुक्यातील आव्हाणे शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. धरणगाव येथील तहसीलदारच्या पथकाने ही कारवाई केली आहे. मात्र, ही कारवाई जळगाव तालुक्याच्या हद्दीत करण्यात आल्याने हे ट्रॅक्टर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आणण्यात आले आणि नंतर तहसीलच्या आवारात लावण्यात आले आहे.

यातील एका ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास वाळू होती तर बाकीचे तीन ट्रॅक्टर रिकामे होते. तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावाच्या हद्दीत नदीतून वाळू उपसा सुरू असल्याचा प्रकार धरणगाव तहसीलदारांच्या पथकाला दिसला. त्यांनी कारवाई केली.
हे देखील वाचा :
- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ”स्वच्छता पुरस्कार 2025” उपक्रम
- गिरीश महाजनांचे ‘जलसंपदा’ फेल, गुलाबराव पाटीलांचे ‘पाणीपुरवठा’ विभाग राज्यात पहिले
- 3 जूनपर्यंत जळगाव जिल्ह्यात ड्रोन उडविण्यावर बंदी लागू
- आनंदाची बातमी! जळगावमार्गे धावणार उधना-गया विशेष ट्रेन
- महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस झोडपणार; 25 जिल्ह्यांना अलर्ट