यावल येथील एकाच कुटुंबातील चौघे बेपत्ता ; परिसरात खळबळ
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२४ । यावल शहरातील एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता झाल्याची घटना ९ रोजी घडली. एकाच कुटुंबातील बेपत्ता झालेले हे चौघे अद्यापर्यंतही न परतल्याने खळबळ उडाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज नगरातील किल्ला परिसरातील रहिवासी संगीता दिलीप सोनार (४८) ही महिला व तिची विधवा मुलगी मीनाक्षी ऊर्फ पूजा मुकेश सोनार (२६), गणेश मुकेश सोनार (७) व पियू मुकेश सोनार (४) हे चौघे ९ मे रोजी घरात कोणाला काहीही न सांगता घराबाहेर गेले व परतलेच नाहीत.
या चौघांचा सर्वत्र शोध घेण्यात आला. नातेवाइकांकडे तपास केला. मात्र, चौघे कुठेच मिळून न आल्याने यावल पोलिस ठाण्यात विधवा महिलेचा भाऊ गणेश दिलीप सोनार यांनी दिलेल्या खबरीवरून हरविल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. एकाच कुटुंबातील चौघे जण बेपत्ता झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या चौघांचा शोध आता यावल पोलिस घेत आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहेत