जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२३ । चाळीसगाव स्वतंत्र जिल्हा निर्मितीची मागणीला आता जोर धरू लागली आहे. कारण नुकत्याच झालेल्या निमंत्रक समितीच्या बैठकीत संघर्ष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समोर येत आहे.

जळगाव जिल्हा मुख्यालय हे चाळीसगाव तालुक्याच्या शेवटच्या टोकापासून जवळपास १४० कि. मी. अंतरावर आहे.यामुळे स्थानिक नागरिकांचे हाल होत आहेत.सामान्य नागरिक, शेतकरी, नोकरदार, व्यापारी आदी सर्वच घटकांसाठी चाळीसगाव जिल्हा निर्माण होणे हे नितांत गरजेचे आहे.

याचे कारण म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, धर्मादाय आयुक्त कार्यालय, परिवहन विभाग, जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस अधीक्षक आदी अनेक कार्यालयांमध्ये चाळीसगाव तालुका व परिसरातील हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत.
सामान्य नागरिक, शेतकरी, नोकरदार, व्यापारी आदी सर्वच घटकांसाठी चाळीसगाव जिल्हा निर्माण होणे हे नितांत गरजेचे आहे. हा विचार घेऊन सामाजिक, शैक्षणिक अशा विविध स्तरांवर कार्यरत असणाऱ्या नागरिकांची एक बैठक घेण्यात आली.
या प्राथमिक बैठकीला धर्मभूषण बागुल, लक्ष्मण शिरसाठ, गणेश पवार, वर्धमान धाडीवाल, उदय पवार, भीमराव आदी उपस्थित होते. खलाणे, अॅड. राहुल जाधव, अजिज खाटीक, प्रवीण वाबळे, रामलाल चौधरी दिलीप घोरपडे, सनील चव्हाण घेतले. मुराद पटेल, अजय कोतकर, तारकेश्वर परदेशी, श्रीकांत राजपूत, मनोज भोसले, हेमचंद्र चौधरी, कृष्णराव देशमुख, राहुल मोरे, महेंद्र महाले, रवींद्र सूर्यवंशीउपस्थित होते.







