जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जामनेर शहरात मंगळवार ते शुक्रवार असे 4 दिवसांचा “जनता कर्फ्यू”लागू करण्याचा निर्णय माजी मंत्री आ. गिरीष महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकित घेण्यात आला आहे.
जामनेरात गेल्या आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या चार दिवसांपासून चाचणी केलेल्या रुग्णांपैकी तब्बल पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आढळत असल्याने प्रशासन चांगलेच हादरले आहे. ही परिस्थिती पहाता मंगळवारपासून जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय रविवारी आमदार गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या सभेत घेण्यात आला.
या कॅर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे. त्यात दवाखाने, मेडिकल, दुध डेअरी सुरु राहणार आहे. दूध डेअरी सकाळी 6 ते 9 आणि संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत उघडी राहणार आहे. उर्वरीत सर्व प्रकारची दुकाने बंद राहणार आहेत. याची जनतेने नोंद घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
“जनता कर्फ्यू ‘मध्ये सर्व जामनेर शहर वासीयांनी स्वतःहून सहभागी व्हावे आणि कोरोना” विषाणूची संक्रमित साखळी तोडण्यासाठी योगदान द्यावे,असेही प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.