जळगाव जिल्हा

विकासाचे शाश्वत स्वरूप असलेला अर्थसंकल्प ; माजी खासदार डॉ.उल्हास पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२५ । अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) संसदेत मोदी ३.० सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प (Union Budget 2025) गरीब, युवक, अन्नदाता आणि नारीशक्तीला डोळयासमोर ठेवून भरीव तरतुदीसह सादर केला अशी प्रतिक्रिया माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी दिली.

अर्थमंत्री म्हणून आपल्या आठव्या अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारामन यांनी देशातील कोट्यवधी जनतेला मोठी भेट दिली आहे. अर्थमंत्र्यांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेची व्याप्ती वाढवली आहे.यासह आता किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे. याचबरोबर कृषी क्षैत्रासाठी मदत केली. तसेच मध्यम मध्यमवर्गीयांना करा मध्ये सवतल देत मोठा दिलासा दिला आहे.

तसेच वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये देखील वाढ करून औषधीच्या किमंती कमी करत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या तीन विद्यापीठांची घोषणा करण्यात आल्याने तंत्रज्ञानाच्या दृष्टीने भारत विकासाकडे वाटचाल करीत आहे. औद्योगिक क्षैत्रासाठी देखिल मोठी घोषण करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने आतापर्यंत सर्वात सुंदर बजेट सादर केले आहे, असंही डॉ. उल्हास पाटील म्हणाले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button