भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरींना अटकेपासून दिलासा

जुलै 1, 2021 4:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जुलै २०२१ । भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांचा भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाचे न्या.संजय भन्साली यांनी गुरुवार, 1 जुलै रोजी जामीन फेटाळला मात्र अर्नेषकुमार व्हर्सेस बिहार खटल्याप्रमाणे पोलिसांना तपासाचे निर्देश देण्यात आल्याने चौधरींना अटकेपासून दिलासा मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.

santosh chaudhari bhusawal

भुसावळच्या मुख्याधिकार्‍यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल असून सत्र न्यायालयात आतापर्यंत 22 व 24 तसेच 30 जून रोजी जामिनावर युक्तीवाद करण्यात आल्यानंतर न्यायालयाने 1 रोजी निकाल जाहीर करण्यात येईल, असे सांगितल्याने निकालाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते.

काय होते नेमके प्रकरण ?

भुसावळातील सर्वोदय छात्रालयाच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने जागेची पाहणी करण्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार हे सोमवार, 14 रोजी अधिकार्‍यांसह गेले असता माजी आमदार संतोष चौधरी यांनी तेथे आल्यानंतर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चौधरी यांच्याविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

संतोष चौधरींना तूर्त जामिनाचा दिलासा

चौधरी यांनी भुसावळ सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केल्यानंतर 22 पर्यंत त्यांना अंतरीम जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर 22 व 24 व 30 जून रोजी दोन्ही पक्षांकडून विविध मुद्यांवर युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर 1 जुलै रोजी अंतीम निर्णय जाहीर करण्यात येईल, असे सांगितल्याने शहरवासीयांचे निकालाकडे लक्ष लागले होते.

गुरुवार, 1 जुलै रोजी न्या.संजय भन्साली यांनी चौधरी यांचा जामीन फेटाळला मात्र अर्नेषकुमार व्हर्सेस बिहार 2014 खटल्याप्रमाणे पोलिसांना तपासाचे निर्देश दिल्याने तूर्त चौधरी यांना अटकेपासून दिलासा मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. न्यायालयात माजी आमदार चौधरी यांच्यातर्फे अ‍ॅड.जगदीश कापडे, अ‍ॅड.मनीष सेवलानी तर सरकारतर्फे अ‍ॅड.विजय खडसे यांनी काम पाहिले. तपास सहा.निरीक्षक मंगेश गोंटला करीत आहेत.

 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now