माजी आमदार संतोष चौधरींच्या जामिनावर 24 रोजी निर्णय

जून 22, 2021 5:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२१ । अतिक्रमण झालेल्या जागेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना माजी आमदार संतोष चौधरी यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याची घटना सोमवार, 14 जून रोजी सायंकाळी घडली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात चौधरींविरोधात गुन्हा दाखल आहे. चौधरींनी जामिनासाठी अर्ज केल्यानंतर न्यायालयाने 22 पर्यंत अंतरीम दिलासा दिल्यानंतर मंगळवारी पुन्हा जामीन अर्जावर सुनावणी झाली. याप्रसंगी न्या.संजय भन्साली यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर 24 रोजी या प्रकरणी निर्णय देणार असल्याचे सांगितल्यानंतर आता निकालाकडे लक्ष लागले आहे.

santosh chaudhari bhusawal

काय आहे नेमके प्रकरण ?

सर्वोदय छात्रालयाच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने जागेची पाहणी करण्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार हे सोमवार, 14 रोजी अधिकार्‍यांसह गेले असता माजी आमदार संतोष चौधरी यांनी तेथे आल्यानंतर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चौधरी यांच्याविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले लक्ष

चौधरी यांनी भुसावळ सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केल्यानंतर 22 पर्यंत त्यांना अंतरीम जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर मंगळवार, 22 रोजी न्या.संजय भन्साली यांच्या न्यायासनापुढे जामिन अर्जावर सुनावणी झाली. याप्रसंगी बाजारपेठ पोलिसांनी दिलेल्या ‘से’ मध्ये चौधरी यांच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांसह मुख्याधिकार्‍यांविरोधात दाखल गुन्ह्याची माहिती देण्यात आली. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर आरोपींच्या वकीलाला दाखल गुन्ह्याबाबत म्हणणे मांडण्याचे निर्देश देत 24 जून रोजी जामिन अर्जावर देण्याचे निर्णय जाहीर केले. याप्रसंगी तपासाधिकारी सहा.निरीक्षक मंगेश गोंटला न्यायालयात उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now