जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । शहर मनपातील राजकारण चांगलेच तापले असून नगरसेवक फुटीच्या भीतीने सत्ताधारी भाजप गोटात चांगलीच तारांबळ उडाली आहे. जळगावात सांगली पॅटर्न यशस्वी होऊ न देण्यासाठी जिल्ह्याचे नेते माजी मंत्री आ.गिरीष महाजन तात्काळ मुंबई रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जळगाव मनपावर सेनेचा महापौर निवडून आणण्यासाठी शिवसेनेसह आघाडीकडून नवीन डाव खेळला जात आहे. भाजपचे २५ पेक्षा जास्त नगरसेवक तळाला लागले असल्याचे सेना नेत्यांनी स्पष्ट केले असल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. काल सायंकाळी माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांच्या कार्यालयावर असलेले भाजप नगरसेवक आज चक्क नॉट रीचेबल असल्याने चांगलाच गोंधळ उडाला आहे. जळगावात मंत्री जयंत पाटलांचा सांगली पॅटर्न यशस्वी होतो की काय? या भीतीने सायंकाळपासून भाजपच्या अनेक छुप्या बैठका सुरू होत्या. रात्री माजी मंत्री आ.गिरीष महाजन तात्काळ विमानाने मुंबई रवाना झाले आहे. तत्पूर्वी त्यांनी विमानतळावर बराच वेळ स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजप-सेनेच्या या डावात कोण यशस्वी होतो हे येत्या २ दिवसात स्पष्ट होणारच आहे मात्र जळगावकर कोणत्या परिस्थितीतून जात आहे याची एकही राजकारण्याला चिंता नाही हे मात्र निश्चित आहे.
हे देखील वाचा :
नाथाभाऊंचा गिरीशभाऊंना दे धक्का? महापालिकेतील काही नगरसेवक ‘नॉट रिचेबल’
महापौर निवडणुकीत ट्विस्ट : शिवसेनेने दाखल केला उमेदवारी अर्ज