जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२२ । फैजपूर येथे शिव जयंतीनिमित्त भाजपा फैजपूर शहर यांच्या वतीने खासदार रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी मोर्चा शाखा गठन, आयुष्यमान भारत व ई श्रम कार्ड वाटप, उज्वला योजना गॅस वाटप” अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमास खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भेट देऊन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच केंद्राच्या विविध योजना अंतर्गत आयुष्यमान भारत, ई श्रम कार्ड व उज्वला योजना गॅसचे लाभार्थ्यांना वाटप करून, ओबीसी मोर्चा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली.

यावेळी खासदार रक्षा खडसे यांच्यासह भाजपा ओबीसी मोर्चा सचिव भरत महाजन, फैजपूर नगराध्यक्ष महानंदा होले, महिला आघाडी शहरध्यक्ष जयश्री चौधरी, माजी नगराध्यक्ष भास्कर चौधरी, पांडुरंग सराफ, भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहेते, प्रमोद चौधरी, निलेश राणे, जिल्हा सरपंच परिषद अध्यक्ष पुरोजित चौधरी, मधुकर कारखाना संचालक नरेंद्र नारखेडे, अनुराधा परदेशी, खरेदी विक्री संघ संचालक नितीन नेमाडे, वसंतदादा परदेशी, संजय सराफ, राजेंद्र चौधरी, रविंद्र होले, कडूसिंग परदेशी, वैभव वकारे, इण्डेन गॅस वितरक प्रदिप पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.
- जळगाव जिल्ह्याची पाण्याची चिंता संपणार? गिरणा धरण शंभरीच्या उंबरठ्यावर!
- पुणे यार्डातील तांत्रिक कामामुळे भुसावळ, जळगावमार्गे धावणाऱ्या ‘या’ रेल्वे गाड्यांच्या सेवेत मोठा बदल
- पावसाचा हायअलर्ट ! जळगावसह अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा
- जळगाव जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत पावसाचा ‘येलो अलर्ट’; हवामान खात्याचा इशारा
- रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ








