---Advertisement---
मुक्ताईनगर

अन्नसुरक्षा व प्रा.कू.ला. योजनेतील विविध कामाबाबत मुक्ताईनगरात सर्वपक्षीय बैठक

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तहसील कार्यालयात तहसीलदार श्वेता संचेती यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच अन्नसुरक्षा व प्रा.कू.ला.योजनेतील विविध कामाबाबत बैठक संपन्न झाली. यात ई केवायसी,आधार सेडींग करणे साठी संबंधित लाभार्थ्यांना सूचना देण्याची चर्चा करण्यात आली.

jalgaon 2022 11 15T144729.284

तालुक्यात १२७७७६ एवढा इंष्टाक पूर्ण झालेला आहे यापेक्षा जास्त लाभ देणे शक्य होत नाही १७०० लाभार्थी योजनेत असून त्यांचे आधार सेंडीग झालेले नाही त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार ePOS मशीन द्वारे ई केवायसी सह आधार अपडेड करून घ्यावे, पुढील एक दोन आठवड्यात जे लाभार्थी सूचना मिळूनही ई केवायसी करणार नाहीत त्यांची नावे ते मयत किंवा स्थलांतरित आहेत असे गृहीत धरून नावे कमी केली जातील जेणेकरून त्या माध्यमातून रिक्त इष्टांक उपलब्ध झाल्यास इतर गरजू लाभार्थ्यांचा अन्नसुरक्षा योजना,प्राधान्य कुटुंबाचा लाभार्थी योजनेत नव्याने समावेश करता येणे शक्य होईल उपस्थित शिवसेना,मनसे,राष्ट्रवादी काँग्रेस,प्रहार जनशक्ती पक्ष,वंचित बहुजन पक्ष,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया काँग्रेस आय,सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---