जळगाव जिल्ह्यातील दोन रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी पत्राचे वाटप

मे 22, 2025 10:02 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी दिलासादायक उपक्रम म्हणून जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात १ मे रोजी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. हे मदत कक्ष जिल्ह्यात प्रथमच सुरू झाले असून यामुळे उपचारासाठी आर्थिक अडचणीत असलेल्या रुग्णांना थेट मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

cm fund 1 1

ग्लोबल कॅन्सर हॉस्पिटल, जळगाव येथे उपचार घेत असलेले श्री दौलत बंडू सोनवणे हे दिनांक ०८ मे रोजी कर्करोगाच्या उपचारासाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जळगाव येथे माहितीसाठी व मदतीसाठी आले होते. त्यानुषंगाने योग्य ती प्रक्रिया पूर्ण करून उपचारासाठी 1 लाख रुपये मदत मुख्यमंत्री सहायता कक्षाकडून देण्यात आली. तसेच न्युक्लियस हॉस्पिटल येथील रूग्ण जिजाबाई अशोक पाटील यांना उपचारासाठी 1 लाख रुपये मदत मुख्यमंत्री सहायता कक्षाकडून देण्यात आली.

त्यानुषंगाने दिनांक १६ मे रोजी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत दौलत सोनवणे व जिजाबाई पाटील या दोघांच्या नातलगांना प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री सहायता निधी मंजूरी पत्राचे वितरण करण्यात आले. रुग्ण व नातलग यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी व रामेश्वर नाईक यांच्याप्रती आभार व्यक्त केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment